सोलापूर : ईगल आय मीडिया
सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरने महाविद्यालयाच्या होस्टेलवर एका खोलीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉक्टर चैतन्य अरुण धायफुले ( वय २४,राहणार तेलंगी पाछा पेठ, सोलापूर ) असे डॉक्टर चे नाव आहे
मंगळवारी हॉस्टेलच्या रूममधील फॅनला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अध्याप समजले नाही.
डॉक्टर चैतन्य हा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कोरोना वॉर्डात रुग्णांवर उपचार करत होता.सोमवारी रात्री कोरोना वॉर्डातील काम संपवून होटगी रोडवरील मुलांच्या हॉस्टेलमध्ये झोपण्यासाठी गेला. मंगळवारी पहाटे त्याने रूममधील पंख्याला दोरीने फास घेतल्याचे दुपारी दिसून आल्यानंतर त्याला त्याचा भाऊ देवल आणि सहकाऱ्यांनी खाली उतरवून तातडीने शासकीय रुग्णालयात नेले मात्र तत्पूर्वीच डॉक्टर चैतन्य याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
डॉ.चैतन्य हा सोलापुरात राहत असताना हॉस्टेलवर गेलाच कसा.ज्या रूममध्ये त्याने आत्महत्या केली ती रूम नेमकी कोणाची होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने काय लिहून वगैरे ठेवले होते काय ? याचा तपास पोलीस करत आहेत. डॉक्टर बी.बी.आस्मा यांनी पोलिसांना याबाबतची खबर दिली .