कृषी विधेयकाच्या निषेधार्थ पंढरीत युवक काँग्रेसचे आंदोलन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
शेतकरी विरोधी असणारे कृषी विधेयक मंजूर केल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा गाढवाच्या गळ्यात बांधून सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील स्टेशन रोड वर आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत थेट पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा गाढवाच्या गळ्यात बांधल्यामुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप शिंदे, सोमनाथ आरे, कृष्णा कवडे, संदीप गायकवाड, समाधान पोळ, विशाल बोडके, अनिकेत देशमाने, सोमनाथ क्षिरसागर यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोदी सरकारने आणलेले कृषी विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करून शेतकरी वर्गाला संपविण्याचा डाव आखलेला असून या विधेयकामुळे बाजार समितीची संपूर्ण व्यवस्था संपुष्टात येणार आहे. यामुळे हजारो जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आणण्याचे पाप मोदी सरकारने केलेले आहे. आधीच नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयामुळे हजारो जण बेरोजगार झाले असताना आता कृषी विधेयकाच्या माध्यमातून गोरगरीबांचा रोजगार हातातून काढून घेण्याचे काम केंद्र सरकारने केलेले आहे. याच बरोबर हमीभावाचे गाजर दाखवून शेतकरी वर्गाला संपविण्याचा डाव आखलेला असून या विरोधात युवक काँग्रेसच्या माध्यमातून नेहमी आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी सांगितले.
Nice pandhrpurkr congress