जिल्हा प्रशासन आणि पदाधिकारी करणार 20 हजार वृक्षारोपण आणि संवर्धन

जि. प.च्या एक पद, एक झाड या मोहिमेचा शुभारंभ

सोलापूर : ईगल आय मीडिया

कोविडच्या या कठीण काळात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्याला आदर्श ठरणारे अनेक उपक्रम राबवून मोठे काम केले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुध्दा सीईओ स्वामी यांनी राबविलेल्या उपक्रमांची दखल घेतली आहे.याबद्दल मी सीईओ स्वामी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. आजची ही “एक पद एक वृक्ष” मोहिमसुध्दा अगदी कल्पक मोहीम आहे. झाडे मोठ्या संख्येने लावण्यापेक्षा लावलेले प्रत्येक झाड जगवणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या “एक पद एक वृक्ष” मोहिमेचा पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषदेच्या नेहरूनगर येथील कुक्कुट प्रशिक्षण केंद्र येथे शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ना.भरणे बोलत होते.


यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता बांधकाम प्रसाद कदम, प्रदीप माने, सार्वजनिक वन विभागाचे संघ्यारानी बंडगर, कार्यालयीन अधीक्षक, सहाय्यक वन संरक्षक बाबा हाके, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे पंडित भोसले, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सुनील कटकधोंड, समाज कल्याण अधिकारी जाधव, कार्यक्रम अधिकारी बालकल्याण जावेद शेख आदी प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती मध्ये पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची संख्या 14000 आहे. ग्रामपंचायतींमध्ये सरपंच अधिकारी व कर्मचारी संख्या 2000 असून मानधनावरील कर्मचारी संख्या 2000 असे एकूण 18000 एवढी संख्या होते. उर्वरित 2000 संस्था-पतसंस्था यांचेकडून लावण्यात येतील. एकंदरीत 20,000 वृक्ष लागवड करून ते पुर्णपणे जगवले जातील. असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.


मान्सूनचे आगमन झाले की शासन स्तरावर व सामाजिक स्तरावर वृक्षारोपणाची लगबग सुरू होते. राज्यात दरवर्षी या कालावधीत लाखो वृक्षांचे रोपण केले जाते. परंतु मोठ्या प्रमाणात वृक्ष लावल्यानंतर सर्वच रोपे जिवंत राहतात असे नाही. रोपटे लावल्यानंतर त्याच्या संवर्धनाकडे वैयक्तिक लक्ष देवून संगोपन करणे आवश्यक आहे. यासाठी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्याऐवजी प्रत्येकाने एकच वृक्ष लावून त्याचे जतन करावे ही संकल्पना पुढे आली व त्यातूनच सीईओ स्वामी यांनी “एक पद एक वृक्ष” हे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या मोहिमेचा शुभारंभ आज पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी कुक्कुट प्रशिक्षण केंद्र येथील परिसरात एकूण 500 रोपांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती रंजना कांबळे ,विवेक लिंगराज, रफिक शेख, सचिन चव्हाण, उमाकांत कोळी, पुनम नरसोडे, विद्या हायनाळकर विद्या शिंदे, श्रीमती जाधव, महेश नारायणकर, राम कांबळे, शकुंतला जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

error: Content is protected !!