सोलापूर जिल्ह्यात कोरोना विरुद्ध ‘मिशन बिगीन अगेन’

जिल्हा परिषद प्रशासन कोरोना लढ्यासाठी पुन्हा सज्ज

सोलापूर : ईगल आय मीडिया


कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांची कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेमधील सर्व विभाग प्रमुख व गट विकास अधिकारी यांना आज लेखी पत्र पाठवून सुचना केलेल्या आहेत.


या पत्रामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले , कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ , आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व शासनाचे आदेशान्वये कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम केले जात आहे.सदर अधिनियमांतर्गत राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कौविड १९ या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० अंमलात आलेल्या आहेत.


यानुसार राज्यात निर्बंध शिथील व टाळेबंदी टप्याटप्याने उठविणे (मिशन बिगीन अगेन ) संदर्भात कोविड १९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत.त्यानुसार जिल्हा परिषद कार्यक्षेत्रामध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याला मुख्यमंत्री यांनी व्ही.सी.द्वारे सुचना केल्या आहेत.या सुचना खालीलप्रमाणे आहेत.


सर्व हॉटेल्स , रेस्टाॕरंट , उपहारगृहे , इ.ठिकाणी नागरिकांना संचार करताना मास्क व सॕनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे.त्याविषयी तपासणी मोहिम राबवावयाची आहे. कोचिंग क्लासेसच्या ठिकाणी मास्क तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे. याची जबाबदारी संबंधित क्लासेस प्रमुखांनी घ्यायची आहे. सार्वजनिक ठिकाणी शासकीय व खाजगी कार्यालये येथे मास्क व सॕनिटायझरचा वापर होताना दिसून येत नाही. त्यामुळे या ठिकाणी संख्यात्मक मर्यादा व कोविड मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी निश्चित करावयाची आहे.

सार्वजनिक ठिकाणी , मंगल कार्यालय , सांस्कृतिक सभागृह , क्रीडा मनोरंजन , बगीचे या ठिकाणी तपासणी पथकाद्वारे तपासणी करावयाची आहे. संख्यात्मक निर्बंध , सामाजिक अंतर, मास्कचा वापर इ.उल्लंघनाविषयी दंडात्मक कारवाई व आवश्यकतेप्रमाणे आस्थापना बंद करणे , राजकीय सभा , मोर्चे , मिरवणूका, संमेलने , लग्नसमारंभ , व अंत्ययात्रा या प्रसंगी संख्यात्मक निर्बंध व सामाजिक अंतराविषयीच्या सुचनांचे पालन होत नसल्यामुळे त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणीची दक्षता घ्यायची आहे.


सर्व खाजगी डॉक्टर यांनी त्यांचेकडे तपासणीसाठी आलेल्या सर्दी , खोकला व तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविडची तपासणी अनिवार्य करावयाची आहे. तपासणी मध्ये पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांना अलगीकरण करणे बंधनकारक आहे. वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन संबंधित आवश्यक कोविड केअर सेंटर , कोविड हॉस्पिटल , कोविड केअर हाॕस्पिटलमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध ठेवायच्या आहेत. सर्व उपकरणे सुस्थितीत असल्याची खात्री करुन पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावयाचे आहे. वेगाने प्रसार करणाऱ्या संवर्गातील व्यक्तींची वारंवार तपासणी करुन सकारात्मक चाचणी आल्यास अलगीकरण कक्षात ठेवायचे आहे.


कोविड १९ च्या वाढत्या प्रसाराबाबत नागरिकांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये प्रचार व प्रसिद्धी करावयाची आहे. मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावयाची आहे. सर्व ग्रामसेवक यांनी दररोज किमान १० मास्क न करणाऱ्या व्यक्तींना दंडात्मक कारवाई करावयाची आहे.तसेच दुकाने, मंगल कार्यालय , शासकीय , निमशासकीय व सार्वजनिक ठिकाणी मास्क विपरता की नाही याची तपासणी करायची आहे.

तसेच गट विकास अधिकारी यांनी फिरती दौऱ्याचे प्रमाण वाढवणे , गट शिक्षण अधिकारी यांनी रोज ५ शाळा तपासणी करण्याच्या सुचना देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी माझं गाव , कोरोनामुक्त गाव या अभियानाची अतिशय चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करुन गावागावात कोरोनाविषयी जनजागृतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा चळवळ उभी करावी आणि यासाठी स्थानिक स्वयंसेवु संस्थांची मदत घ्यावे असे आवाहनही केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!