सोलापूर जिल्हा परिषदेत z संदर्भ प्रणाली राबवली जाणार

5 फेब्रुवारी पासून अंमलबजावणी : सी ई ओ स्वामी यांची माहिती

सोलापूर : ईगल आय मीडिया
जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामकाजात सकारात्मकता निर्माण करणे व महत्त्वाच्या पत्राचा जलद निपटारा करण्यासाठी Z संदर्भ प्रणाली येत्या ५ फेब्रुवारी पासून अंमलात आणणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.


याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले , जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये अनेक पत्र , निवेदने , तक्रारी , न्यायालयीन आदेश व अर्धशासकीय पत्र आदी प्राप्त होत असतात.तसेच मा.खासदार , आमदार , जिल्हा व पंचायत समितीचे सदस्य यांचेही पत्र प्राप्त होत असतात.त्यावर तातडीने कार्यवाही होणे व उत्तर देणे आवश्यक आहे.प्राप्त होणारे सर्वच पत्र निवेदने , तक्रारी , न्यायालयीन आदेश , अर्धशासकीय पत्र महत्त्वाचे असतात.सदर संदर्भाचा निपटारा करुन शुन्य प्रलंबितता ठेवणे अपेक्षित असते.परंतु कामाचा वाढता व्याप व कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या यामुळे शक्य होत नाही.

अशा पत्रावर कार्यवाही होत नाही अथवा झाल्यास माहिती प्राप्त होत नाही.त्यामुळे अनेक महत्त्वाचे पत्र / संदर्भ दुर्लक्षित राहतात.न्यायालयीन प्रकरणात विलंब होऊन अवमान याचिका दाखल होतात.त्यामुळे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी नाराज होतात.
दरम्यान या प्रणालीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विभागाकडे टपालातून व प्रत्यक्ष भेटून , ईमेल द्वारे प्राप्त पत्र , संदर्भ आदेश येतात.त्यातील महत्त्वाचे , अतिमहत्वाचे , तातडीचे , न्यायालयीन आदी पत्रावर मुख्य कार्यकारी अधिकारी हे Z मार्किंग करणार आहेत.

त्या पत्रांची मुख्य कार्यकारी विभागामध्ये नोंदवून संबंधित विभागांना पाठवून देण्यात येणार आहेत.त्यानुसार संबंधित विभागातही त्याची नोंद घेऊन सदरचा पत्रव्यवहार संगणिकृत करण्यात येणार आहे.आणि अशी पत्रे तात्काळ निकालीत काढण्यात येणार आहेत.या पत्र व्यवहारावर समन्वय ठेवण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये एक समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून त्यांच्यावर विभागप्रमुखांचे नियंत्रण असणार आहे.आणि या Z प्रणालीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी हे विभागप्रमुखांच्या दर साप्ताहिक बैठकीला आढावा घेणार आहेत.

या महत्त्वाच्या प्रणालीमध्ये दुर्लक्ष अथवा हयगय करु नये अन्यथा त्यांची गांभीर्याने नोंद घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी Z संदर्भ प्रणाली सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!