जिल्हा परिषद आदर्श सरपंच पुरस्कार देणार

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांची घोषणा

पंढरपूर येथे नुतन ग्रामपंचायत सदस्यांच्या संवाद कार्यशाळेचे उदघाटन करताना सिईओ दिलीप स्वामी, भास्करराव पेरे – पाटील , उद्योजक अभिजीत पाटील, मनसेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे , बिडीओ रविकिरण घोडके , कार्यक्रम समन्वयक सचिन जाधव, आदी दिसत आहेत.

पंढरपूर : ईगल आय मीडिया

ग्रामविकासासाठी पुढे या. काम करणारे सरंपच यांना बेस्ट सरपंच पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे आज मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जाहिर केले.
पंढरपूर येथे आज तालुक्यांतील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या
संवाद कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या प्रसंगी पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील, उद्योजक अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मनसे चे सहकार विभागाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, प्रमुख उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना उद्योजक अभिजीत पाटील यांनी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. कमी क्षेत्रात जास्त ऊसाचे उत्पन्न मिळेल यांचे.नियोजन करता येईल. बिनविरोध ग्रामपंचायती साठी केलेल्या आवाहनास राज्यभर प्रतिसाद मिळाला. यासाठी बरीच आमदार मंडळीनी पुढाकार घेतला असल्याचे सांगून जिल्ह्यात ६३ पेक्षा अधिक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे सांगितले.


संवाद समृध्द गावाचा या विषयावर बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, गावांच्या विकासासाठी पुढे या. निवडणुका झाल्या. विकासासाठी आता पुढे या.विकास म्हणजे केवळ बौध्दिक विकास नाही. मिळालेल्या संधीचं आता सोनं करा. गरजेवर आधारीत गावांच्या विकास कामाचे नियोजन करा. या योजनांचा लोकांना कसा वापर होईल याचा विचार करा. कामात चढाओढ पेक्षा निकोप स्पर्धा ठेवा. जिल्हयात सरपंचाचा सरपंच क्लब करून चांगले काम करणारे सरपंच यांचा दरमहा कामाचा आलेख पाहून बेस्ट सरपंच म्हणून गौरव करणेत येणार आहे. हा गौरव सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह करणेत येणार आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.


वृक्ष हे पावसाचे ATM – भास्करराव पेरे -पाटील निसर्गाचे आपण देणं लागतो. वृक्ष लागवड करा. केवळ लोकसंख्येनुसार नाही तर प्राण्यांना देखील आॅक्सीजन लागतो. त्याच्या सह नियोजन करा. ग्रामसेवक या गावाचा महत्वाचा दुवा आहे. अधिकारी व ग्रामसेवक यांना नाराज करू नका. ग्रामसेवक जो करू शकतो तो कुणीच करू शकत नाही. १५- ७५- नवीन योजना तयार करीत आहोत. तुम्ही किमान १५ ते ७५ झाले २६ जानेवारी ला लावा. फळांची झाडे लावा. माझे गावाचा टॅक्स १ एप्रिल ला जमा होतो. जे टॅक्स भरतात त्याचे हस्ते, ध्वजारोहण करा. गावाचे उत्पन्न वाढल्याशिवाय पर्याय नाही. पाच वर्षानंतर पुढील निवडणुकीस उभारणार नाही असे समजून काम करा असेेे आवाहन पेेेरेे – पाटील याांनी केेेले.

या प्रसंगी जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झालेबद्दल १ लाख रूपयाचा धनादेश देऊन ग्रामस्थ स सदस्यांचा गौरव सिईओ दिलीप स्वामी व भास्करराव पेरे पाटील यांचे हस्ते करणेत आला. सुत्रसंचालन नितीन पवार यांनी केले. शेवटी आभार प्रा. तुकाराम मस्के यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!