जिल्हा पोलीस अधिक्षकांनी घेतला कार्तिकी यात्रेचा आढावा


पंढरपूर शहराची केली पाहणी : बंदोबस्त आणि यात्रेची माहिती घेतली


पंढरपूर : ईगल आय न्यूज

कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पंढरपूर येथे आढावा बैठक घेतली. सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षकपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी सोमवारी पंढरपूरला भेट दिली आणि शहराची पाहणी करून यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला.
शिरीष सरदेशपांडे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन त्यांनी दर्शन घेतले. तसेच त्यांनी शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची रुक्मिणी पोलीस संकूल येथे बैठक घेतली. 


यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोनि. धनंजय जाधव, पोनि. अरुण फुगे, पोनि. मिलींद पाटील, सपोनि. सी. व्ही. केंद्रे, सपोनि. प्रशांत भागवत, सपोनि. कपिल सोनकांबळे, सपोनि. मनोज सोनवलकर, सपोनि. आकाश भिंगारदेवे यांच्यासह अन्य अधिकार व कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सरदेशपांडे यांनी यात्रा कालावधीत बंदोबस्त करताना पोलीसांना येणाऱ्या अडचणीची माहीती जाणून घेतली आहे. त्याचबरोबर यात्रेत कशा प्रकारे बंदोबस्त असतो, गर्दीवर कशा प्रकारे नियंत्रण ठेवले जाते. महाराज मंडळींनी कशा पध्दतीने संपर्क केला जातो. याची देखील माहीती जाणून घेतली.


 यानिमित्ताने चंद्रभागा नदी परिसर, महाद्वार घाट, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर,  गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील गोपाळकृष्णाच्या मंदीरास जिल्हा पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी भेट दिली. 

Leave a Reply

error: Content is protected !!