9 वीचे गुण ठरणार महत्वपूर्ण : जून अखेर निकाल जाहीर
टीम : ईगल आय मीडिया
दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द केली होती. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केली.
अधिक माहिती देताना ना.गायकवाड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिकसाठी २० गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जून अखेर जाहीर करण्यात येणार आहे अशीही गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली.
दहावी परीक्षेच्या निकालाचे निकष
वर्षातील लेखी मूल्यमापन – 30 गुण
दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत – 20 गुण
नववीचा विषयानिहाय गुण – 50 गुण
दहावीचा निकाल कसा लावणार?
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.
ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.
iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाबाबतची पद्धती तयार करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोविड स्थितीत वस्तुनिष्ठ पद्धतीने झाले होते. त्याची नोंद सरल प्रणालीत आहे, असेही त्या म्हणाल्या.
अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा
अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचं देखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतील. अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. यानंतर कनिष्ट महाविद्यालयांकडे ज्या जागा रिक्त राहतील त्या जागावंर जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत त्यांना प्रवेश देण्यात येईल, असं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्यातील विविध बोर्डांंच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धती वेगळ्या असल्यानं अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
Okk