एस टी बस गेली वाहून

ओढ्याला पूर आलेला असताना एस टी बस पाण्यात घातली

टीम : ईगल आय मीडिया

उमरखेड – पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरुन पाणी वाहत असताना नागपूर डेपोची एसटी बस चालकाने नाल्यावरुन घातल्याने बस नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली आहे. बसमधे चार ते सहा प्रवासी होते असे समजते.या घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू तर चालकासह काही प्रवाशी बेपत्ता असल्याची माहिती मिळली आहे.

बस गेली वाहून : संबंधित बातमीचा व्हीडिओ पहा !

मराठवाडा, बीड, नागपूरमध्ये सोमवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असताना मंगळवारी सकाळी नागपूर आगाराची एमएच १४ बी.टी.५०१८ या क्रमांकाची बस उमरखेड येथून काही प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती. एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस नेण्याचा प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे.

एसटी बस नाल्यात वाहून गेल्यानंतर एसटीतील दोन प्रवासी झाडावर चढलेले आहेत व दोन लोक एसटी बसच्या टपावर आहेत. कंडक्टरनं झाडावर असून त्याने सोबत ५ते ६ प्रवासी असल्याचे ओरडुन सांगितले. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बस नागपूर डेपोची होती नांदेड वरून नागपूरला निघाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास एसटी दहागांव नाला पार करत असताना हा प्रकार घडला आहे. या मार्गावर दहेगाव नाला असून त्यावर मोठा पूल आहे. दोन दिवसांपासून या पुलावरून पाणी वाहत आहे. असे असताना बस चालकाने नाल्यावरून बस काढण्याचा प्रयत्न केला. परिसरात असलेल्या नागरिकांनी बसला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने दुर्लक्ष केले.

दरम्यान रस्त्याचा अंदाज न आल्याने बस थेट नाल्यात कोसळली. या घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू तर चालकासह काही प्रवाशी बेपत्ता असल्याची माहिती मिळली आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. उमरखेड तहसीलदार, पोलीस ठाणेदार सध्या घटनास्थळी आहेत व स्थानिक नागरिक व तालुका टीमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!