राज्यात 24 तासात 20,489 नवीन रुग्ण

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्के

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात शनिवारी 24 तासात 20 हजार 489 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर शनीवारीच 10 हजार 801 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

राज्यात आजवर एकूण 6 लाख 36 हजार 574 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सध्या 2 लाख 20 हजार 661 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 8 लाख 63 हजार62 झाली असून 25 हजार 964 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.01% झाले आहे अशीही माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

Leave a Reply

error: Content is protected !!