राज्यात कोरोना मुक्तीचे सीमोल्लंघन

सलग चौथ्या दिवशी बाधितांच्या तुलनेत बरे झालेले रुग्ण अधिक

मुंबई : ईगल आय मीडिया

राज्यात आता झपाट्यानं करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून गेल्या चार दिवसांपासून नवीन करोनाबाधितांचा आकडा १० हजारांहून खाली उतरला आहे. आज दिवसभरात ६ हजार ४१७ रुग्ण सापडले आहेत. आज १० हजार 4 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर, राज्याच आजपर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ करोनाबाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ८८. ७८ टक्के इतके झाले आहे.

राज्यात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच आता सकारात्मक बातमी समोर येत आहे. राज्यात आज १३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ६ हजार ४१७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १० हजार ००४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या आणखी जवळ पोहचला असून हा खूप मोठा दिलासा ठरला आहे.

राज्यात करोना मृतांची संख्याही कमी होताना दिसत आहे. आज १३७ करोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका झाला असून राज्यात एकूण मृतांचा आकडा ४३ हजार १५२ इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८५,४८,०३६ चाचण्यांपैकी १६,३८,९६१ (१९.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत

Leave a Reply

error: Content is protected !!