राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ चालूच

गुरुवारी 5 हजारहून अधिक पॉझिटिव्ह केसेस : 38 मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया

 राज्यात करोना संसर्गाबाबत चिंता वाढत असून दिवसभरातील रुग्णवाढीचा विचार करता कालच्या तुलनेत आज नव्या रुग्णांची संख्या ६४० ने अधिक आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात ५ हजार ४२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. काल ही संख्या ४ हजार ७८७ इतकी होती. आजची संख्या देखील बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे.

राज्यात करोनाचे नवे रुग्ण वाढत असून आज दिवसभरात ५,४२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण २,५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दिवसभरात एकूण ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तसेच आज दिवसभरात २ हजार ५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून दिवसभरात ५ हजार ४२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज राज्यात एकूण ३८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४० इतकी होती.

आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ८७ हजार ८०४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५ टक्के इतके झाले आहे.

तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५५ लाख २१ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ८१ हजार ५२० नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.४१ टक्के इतके आहे. सध्या राज्यात २ लाख १६ हजार ९०८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात कालच्या तुलनेत एक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढून ती आज एकूण ४० हजार ८५८ इतकी झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास मुंबईत एक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ७८२ इतकी असून ठाण्यात ही संख्या ४ हजार ९९८ इतकी. तर, पुण्यात एक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ हजार ९७७, नाशिक येथे ९८८, अहमदनगर येथे ८५६, औरंगाबाद येथे ८७६, नागपूर येथे ५ हजार ४६६, कोल्हापूर येथे १८० इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त एक्टिव्ह रुग्णसंख्या पुण्यात असून सर्वात कमी रुग्णसंख्या गडचिरोली आहे. येथे एक्टिव्ह रुग्णांची संख्या ६१ इतकी आहे.

One thought on “राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ चालूच

  1. धक्कादायक आकडेवारी असून काळजी घेण्याची गरज आहे.🙏

Leave a Reply

error: Content is protected !!