राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 10 लाखांकडे

24 तासांत विक्रमी २० हजार १३१ नवे करोना रुग्ण

पंढरपूर : ईगल आय मीडिया

मागील २४ तासांमध्ये विक्रमी 20 हजार करोनामुळे ३८० 131 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत तर मृत्यूंची नोंद झाली आहे.त्याचबरोबर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या ९ लाख ४३ हजार ७७२ इतकी झाली आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, मागील २४ तासांमध्ये १३ हजार २३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापैकी ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर करोनामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण २७ हजार ४०७ मृत्यू झाले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ४३ हजार ४४६ अॅक्टिव्ह केसेस आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आत्तापर्यंत महाराष्ट्रात ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.२६ टक्के झाला आहे. सध्याच्या घडीला राज्यात १५ लाख ५७ हजार ३०५ लोक होम क्वारंटाइन आहेत तर ३८ हजार १४१ लोक हे संस्थात्मक क्वारंटाइन आहेत अशी माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून प्रभावी उपाय योजना राबविण्यात येत आहेत. बेड उपलब्ध करुन देणे, चाचण्यांचे दर, ऑक्सिजनची उपलब्धता, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ हे सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणे. तसंच करोनामुळे होणारे मृत्यू जाहीर करताना पारदर्शकताही बाळगण्यात आल्याचे सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!