राज्यात एकाच दिवशी 26 हजाराहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

बरे होण्याचे प्रमाण 83 टक्क्यांपर्यंत : मृत्यू दर 2.64 टक्के

मुंबई : ईगल आय मीडिया

राज्यात आज आज एकाच दिवशी २६ हजार ४४० इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट ८२.७६ टक्क्यांवर पोहचला आहे. ३०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा आज २ लाख २१ हजार १५६ इतका खाली आला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, राज्यात आज ३०८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १२ लाख ५५ हजार ७७९ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.७६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ (२०.०५ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २४ हजार ९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!