बरे झालेल्याची संख्याही साडे तीन लाखांवर
टीम : ईगल आय मीडिया
रविवारी राज्यात एकूण12 हजार 248 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या 5 लाखांवर गेली असून बरे झालेल्या लोकांची संख्या ही साडे तीन लाखांवर गेली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात झालेला आहे. राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने ही कोरोना कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न केले असले तरीही तो नियंत्रणात येण्याऐवजी वाढतो आहे. महाराष्ट्रात रविवार अखेर कोरोना बाधितांची संख्या 5 लाख 15 हजार 332 एवढी झाली आहे.
राज्यातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार
राज्यात आज रविवारी 12,248 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 515332 अशी झाली आहे. दरम्यान, रविवारी नवीन 13, 348 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 3, 51, 710 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 14,5558 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत अशीही माहिती देण्यात आली.
गेल्या काही महिन्यात राज्यातील रुग्ण वाढीच्या तुलनेत रुग्ण संख्या बरी होऊन घरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच राज्याचा मृत्यू दर ही राष्ट्रीय दराच्या तुलनेत कमी आहे.