7 वी पास आहात का ?

तरच ग्रामपंचायतीला अर्ज भरा ; अन्यथा अपात्र ठराल

टीम : ईगल आय मीडिया

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली असताना राज्य निवडणूक आयोगाने महत्वाचा आदेश काढुन 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या उमेदवारासाठी किमान 7 वी पास किंवा समकक्ष शिक्षण असणे आवश्यक मानले आहे. या नवीन आदेशामुळे 7 वी पास नसलेल्या 1 जाने. 1995 नंतर जन्मलेल्या उमेदवारांचे स्वप्न भंग पावणार आहे.

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर पासून सुरू झालेली आहे. तर राज्य निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर रोजी एक आदेश काढून ग्रामपंचायत सरपंचपदासाठी किमान 7 वी पास ची शैक्षणिक आर्हता निश्चित केली आहे. त्यानुसार ज्या उमेदवाराचे वय 21 पेक्षा कमी नाही, ज्याचे शिक्षण 7 वी किंवा समकक्ष झालेले नाही. तसेच त्या व्यक्तीला इतर कोणत्याही कायद्याखाली अपात्र ठरवण्यात आले आहे.अशा व्यक्तीला सरपंच म्हनून निवडण्यास अपात्र मानले जाणार आहे.

या निवडणुकीत सरपंच पदाची निवड थेट होणार नाही तर सदस्यातून निवड केली जाणार आहे. त्यामुळे जे सदस्य 7 वी पास नाहीत त्यांना सरपंच म्हणून काम करण्यास अपात्र ठरवण्यात येणार आहे. या आदेशानुसार 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या उमेदवारास सरपंच होण्यासाठी 7 वी पास असणे बंधनकारक आहे.

मात्र सदस्य म्हणून त्याला 7 वी पास नसले तरी पात्र ठरवले जाईल का हे या आदेशात स्पष्ट होत नाही. मात्र हा नियम केवळ 1995 नंतर जन्मलेल्या उमेदवारास लागू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!