ठाकरे सरकारमधील मंत्र्यांस 3 महिन्यांची शिक्षा

8 वर्षांपूर्वी पोलिसास केली होती मारहाण

टीम : ईगल आय मीडिया

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने पोलीस मारहाण प्रकरणात ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला आहे. ठाकरे सरकारला विशेषतः काँग्रेसला यामुळे धक्का बसला आहे.

आठ वर्षांपूर्वी यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि दोन कार्यकर्त्यांचाही समावेश होता.

या प्रकरणात फितूर होऊन साक्ष देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अगोदरच डळमळीत असलेल्या ठाकरे सरकारला या निकालाने धक्का बसला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाला व प्रकरण न्यायालयात गेले. आता न्यायालयाने या प्रकरणी यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला आहे. तसंच कारचालक आणि दोन कार्यकर्त्यांनाही दोषी ठरवलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!