राज्यात एका दिवसात 17 हजार 433 कोरोना रुग्ण

पुणे 1 लाखाच्या उंबरठ्यावर : राज्यात 25 हजार मृत्यू

मुंबई : ईगल आय मीडिया

बुधवारी 24 तासात राज्यात १७ हजार ४३३ नव्या करोनाबाधित रुग्णांची तर २९२ जणांच्या मृत्यूचीही नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

राज्यात आतापर्यंत एकूण ५ लाख ९८ हजार ४९६ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत २५ हजार १९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच आज दिवसभरात १३ हजार ९५९ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ७२.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात ४२ लाख ८४ हजार करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ८ लाख २५ हजार ७३९ करोना चाचण्या सकारात्मक आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

पुण्यातील रुग्णांची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर

पुणे शहरात बुधवारी दिवसभरात नव्याने १ हजार ६२७ रुग्ण आढळले. त्यानंतर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ९८ हजार ६९५ झाली आहे. तर आज दिवसभरात ४३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आतापर्यंत पुण्यात २ हजार ३७५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे पालिकेकडून देण्यात आली.

Leave a Reply

error: Content is protected !!