ई. 11 वी सीईटी परीक्षा : नवीन पोर्टल सुरू

आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

टीम : ईगल आय मीडिया

इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देण्याकरिता अर्ज भरण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाचे नवीन पोर्टल आजपासून सूरु झाले आहे. त्या पोर्टलवर आजपासून 2 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

या संदर्भातील सूचना पत्र मंडळाच्या वतीने काल च जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना सीईटी साठी अर्ज दाखल करायचा आहे त्यांनी आज ( दि. 26 जुलै ) दुपारी 3 वाजल्यानंतर 2 ऑगस्ट च्या रात्री 11.59 पर्यंत आपला अर्ज पोर्टलवर भरायचा आहे.

https://cet.11thadmission.org.in

वरील लिंकवरून जाऊन नवीन पोर्टलवर अर्ज भरा

अर्ज भरण्यासाठी ईमेल आयडी, पूर्वीचा मोबाईल नंबर अपडेट करणे किंवा नव्याने अर्ज भरताना मोबाईल नंबर आवश्यक आहे. परीक्षेचे माध्यम विद्यार्थ्यांनी निवडायचे आहे. सेमी इंग्लिश विकल्प निवडल्यास विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांच्या प्रश्नासाठी इंग्रजी माध्यम आली. विद्यार्थ्यांनी त्याच्या निवासस्थानाचा पत्ता द्यायचा आहे, त्यानुसार त्याचे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येणार आहे.यापूर्वी 10 विचा परीक्षा फॉर्म भरताना ज्यांनी sebc प्रवर्गाची नोंदनीं केली असेल त्यांनी आता खुला किंवा ews हा प्रवर्ग निवडावा अशा सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी परीक्षा मंडळाने 21 जुलै पासून अर्ज भरण्याची मुदत दिली होती,मात्र तांत्रिक अडचण आल्याने नव्याने दुसरे पोर्टल तयार करण्यात आले आहे. आता त्या पोर्टलवर 11 वी सीईटी साठी फॉर्म भरावा लागणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!