मणिपूर घटनेचाही केला निषेध : पंढरपुरात सर्व पक्षीय आंदोलन
Photo : संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसह मणिपूर दंगलीच्या निषेधार्थ आंदोलन प्रसंगी उपस्थित सर्वपक्षीय कार्यकर्ते
पंढरपूर : ईगल आय न्यूज
राष्ट्रगीत, देशाचे संविधान यांच्या पाठोपाठ राष्ट्र पुरुषांची बदनामी केल्या प्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि भिडे यांना अटक करण्यात यावी, त्याच बरोबर मणिपूर राज्यात महिलांची नग्न धिंड काढल्या प्रकरणाचाही निषेध करणारे सर्वपक्षीय आंदोलन पंढरपुरात करण्यात आले.
यावेळी संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मागील काही दिवसात संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा फुले, साई बाबा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केलेली आहेत. त्यामुळे सामाजिक वातावरण कलुषित झाले आहे. लाखो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा वक्तव्या बद्दल संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली.
तसेच मणिपूर राज्यात जातीय दंगलीत महिलांची नग्न करून रस्त्यावर धिंड काढली आहे. त्याबद्दल अशी घटनांचा निषेध नोंदवण्यात आला आणि त्या धिंड प्रकरणातील सर्व आरोपीना अटक करावी अशीही मागणी करण्यात अली.
यावेळी किरण घाडगे, अमर सूर्यवंशी, रवी मुळे, राजू उराडे, समीर कोळी, प्रशांत शिंदे, संदीप पाटील, राहुल पाटील, सागर गायकवाड, सुदर्शन खंदारे, देवानंद वीरकर, हनुमंत मोरे, किशोर जाधव, आनंद सोमारे, शशिकांत चंदनशिवे, शिवाजी मस्के, स्वप्नील गायकवाड, स्वागत कदम, लंकेश बुराडे, आकाश माने, सचिन बंदपट्टे, प्रकाश लोखंडे, बाळासाहेब आसबे यांच्यासह संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना ( ठाकरे गट ) राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ), रिपब्लिकन सेना, भीमशक्ती सामाजिक संघटना या संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.