भावी अभियंत्याने आजाराला कंटाळून केली आत्महत्या

कोर्टी ( ता.पंढरपूर ) येथील घटना

पंढरपूर : ईगल आय मीडिया

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने आजारपणातून आलेल्या नैराश्याने ग्रस्त होऊन ब्लेडने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली आहे. पंढरपूर-कराड रोडनजीक सकाळी शहरापासून जवळ असलेल्या ‘श्रीनगरी’त रणजित शशिकांत गायकवाड (रा. श्रीनगरी, कोर्टी रोड, मुळ रा. तिसंगी) असे त्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.  आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी, रणजीत गायकवाड हा विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो आजारी होता. मधुमेह, रक्तदाब अशा आजारांनी ग्रस्त असल्याने तो मानसिक तणावाखाली होता. त्यातूनच त्याने सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरातले सगळे कामात असताना सर्वांची नजर चुकवून ब्लेडने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.  

आत्महत्येपुर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून ‘मी स्वतःच्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करत आहे. यात घरच्या लोकांचा कोणताही दोष नाही’, असा मजकूर असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे हे करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!