पंढरपूर तालुक्यात नऊ ठिकाणी नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी दिलेल्या लोकसेवेचा वाटेवर आपणाला चालायचे आहे. त्यांच्या विचारातून पंढरपूर तालुक्यातील 500 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊन त्यांना दृष्टी मिळणार आहे. त्यामुळे ह्या शिबिरातून सर्वार्थाने स्व. सुधाकरपंतांना आदरांजली ठरली आहे. असे प्रतिपादन युवा नेते प्रणव परिचारक यांनी केले.
कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिचारक युवा मंच यांच्या वतीने पंढरपूर तालुक्यात नऊ ठिकाणी नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाली. या शिबिराची सांगता सोमवारी कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये झाली. याप्रसंगी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख , पंचायत समितीच्या सभापती अर्चना व्हरगर , कासेगावच्या सरपंच सुनंदा भुसे , तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ भोसले , जयसिंग देशमुख ,मुकुंद राजोपाध्ये , दाजी भुसनर , दिनकर नाईकनवरे , बी.पी. रोंगे , हरिष गायकवाड, तानाजी वाघमोडे, दिलीप गुरव , प्रशांत देशमुख , दिनकर मोरे , बाळासाहेब यलमार , सुनील भोसले , बाळासाहेब शेख , सुभाष मस्के , दत्ता ताड आदी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना परिचारक म्हणाले , राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती यांच्या सहकार्याने पंढरपूर तालुक्यातील 8 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करकंबच्या ग्रामीण रुग्णालयात नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाली. यामध्ये तब्बल दोन हजार रुग्णांची नेत्र तपासणी झाली. तर साधारणपणे 500 रुग्ण हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पात्र ठरले आहेत. पुढील पंधरा दिवसांमध्ये या सर्व रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर त्यांची फेरतपासणी व सर्व औषधोपचार देखील मोफत दिले जाणार आहेत.
स्वर्गीय मोठ्या मालकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पाचशे लोकांना दृष्टी देण्याचे भाग्य या तालुक्यातील सर्व तरुण सहकारी मित्रांना मिळाले. याचा आपणास आनंद असल्याचे सांगत त्यांनी या शिबिरातील सहभागी सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. तसेच लोकांच्या आरोग्यसेवेच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने पुढील दोन वर्ष प्रयत्न करावे लागतील. तरच कोरोना नंतरचा समृद्ध समाज आपण घडवू
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतराव देशमुख बोलताना म्हणाले , कोरोनाच्या काळामध्ये अनेक ऑपरेशनला राहीली होती. प्रणव परिचारक यांच्या या उपक्रमातून आज तब्बल पाचशे रुग्णांना दृष्टी मिळाली आहे. एक प्रकारे या रुग्णांना दत्तक घेण्याचे काम परिचारक यांनी केले असल्यास उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.
या सांगता समारंभ प्रसंगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. पांडुरंग परिवार युवक आघाडी यांच्या वतीने तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र , नेत्ररोग तज्ञ आणि सर्व डॉक्टरांना कृतज्ञता पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने डॉ. एकनाथ बोधले , प्रशांत देशमुख , हरीश गायकवाड , दाजी भुसनर ,डॉ. बी.पी. रोंगे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून कासेगाव येथीलही नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.