माळशिरस तालुक्यात ऊस दर आंदोलनाचा भडका

रस्त्यावर टायर्स जाळून वाहतूक बंद पाडली


माळशिरस : ईगल आय मीडिया

मलोली – साळमुख ( ता. माळशिरस ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री साडेआठ वाजता अचानक ऊस वाहतूक अडवून रस्त्यावर टायर जाळून आंदोलन सुरु केले. ऊसाला 2500 रुपये पहिली उचल देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन ऊसाचा पहिला हप्त्या कारखानदार यांनी जाहीर करावा या मागणीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी व सोलापूर जिल्हा पोलिस प्रमुख यांचेकडे निवेदन देऊन दोन दिवसांचा कालावधी दिला होता. तो पूर्ण झाला मात्र जिल्ह्यातील एकही कारखानदार व प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यामुळे शेतकरी संघटना यांनी आंदोलन छेेडले आहे.

27 तारखेला जर दराची कोंडी नाही फुटली तर आक्रमक आंदोलन ! ऊस आंदोलन प्रकरणी 4 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत, 27 तारखेला कलेक्टर नी ऊस दरासंदर्भात मिटींग आयोजित केली आहे.
शेतकरी व स्वाभिमानी संघटनानी तीव्र विरोध केला. अनेक कारखानदारांचे संंघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन येत आहेत, मात्र 2500 रुपयावर FRP + 14% दरवाढीवर संघटना ठाम आहेत, 27 ला तोडगा नाही निघाला तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

अकलूज ,माळीनगर,श्रीपुर,राजेवाडी या ठिकाणी जाणारे रस्ते अडवून ऊस वाहतूक थांबवून रस्त्यावर पेटते टायर टाकून त्या ठिकाणी वाहतूक अडवून धरली.


सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना,बळीराजा शेतकरी संघटना,प्रहार शेतकरी संघटना या चारही संघटना आंदोलनात उतरल्या असून कारखानादार यांनी ऊसाची पहिली उचल लवकर जाहीर नाही केली तर, ऊसदर आंदोलनाचा भडका या ही पेक्षा आणखी तीव्र होऊ शकतो,असा ईशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

error: Content is protected !!