वाखरीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर्स फोडले
पंढरपूर : ईगल आय न्यूज
ऊस दर संघर्ष समितीने आवाहन केल्यानंतरही ऊस वाहतूक सुरू राहिल्याने बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वाखरी येथील थोरात पेट्रोल पंप येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे सर्व टायर्स अज्ञात लोकांनी फोडले आहेत. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी हिंसक घटना घडल्याने ऊस दर आंदोलन पेटल्याचे दिसते.
पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास दादा गुंडीबा पाटील ( चाळीसगाव, जि.जळगाव ) यांचा ( एम एच 19, 2809 ) हा ट्रॅक्टर चळे ( ता.पंढरपूर ) येथुन ऊस घेऊन निघाला होता.
परीचारकांचा ‘तो’ ऑडिओ पुन्हा व्हायरल झाला.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर्स फोडल्यानंतर 11 महिन्यांपूर्वी एका ट्रॅक्टर मालकासोबत परीचारकांचा झालेला संवाद ऑडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
https://youtu.be/TtfgwnTkCYE
रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर वाखरी हद्दीतील बाजीराव विहीर परिसरातील थोरात पेट्रोल पंप येथे आला असता. अज्ञात 3 जणांनी येऊन चाकु दाखवून ट्रॅक्टर अडवला आणि ट्रॅक्टरच्या दोन्ही टायर्सचे सर्व 8 आणि ट्रॅक्टर चे दोन्ही मोठे टायर्स फोडले आहेत. या घटनेत ट्रक्टर चे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.