सोलापूर जिल्ह्यात अद्याप ऊस दर जाहीर नाही
टीम : ईगल आय मीडिया
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे – बालाजी नगर येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ना अडवून ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर टायर्स पेटवून वाहतूक बंद पाडली गेली.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन 1 महिना उलटला तरीही अद्याप शेतकऱ्यांच्या मागणी नुसार एकही साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे विविध शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन सुरू आहे.
मागील आठवड्यात युटोपीयनच्या गव्हाणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उद्या मारून गाळप बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. रविवारी रात्री पुन्हा बालाजी नगर येथे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर रोखण्यात आले आणि त्यांच्या समोर पेट्रोल टाकून टायर्स जाळण्यात आले होते. त्यामुळे ऊस वाहतूक बंद पडली होती.