ऊसाची ट्रॉली अंगावर पडल्याने एकजण ठार

नारायण चिंचोली ( ता.पंढरपूर ) येथील दुर्घटना


पंढरपूर : ईगल आय मीडिया
नारायण चिंचोली ता. पंढरपूर येथे उसाने रलेली ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर पडून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. महेश बलभीम भोसले (वय 31 रा. तुंगत ता. पंढरपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान ही दुुर्घटना घडली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, नारायण चिंचोली जवळ असणाऱ्या कोळेकर वस्ती येथील कच्च्या रस्त्याने उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या घेऊन ट्रॅक्टर पंढरपूर – मोहोळ मार्गावरील डांबरी रस्त्यावर चढत होता . यावेळी ट्रॅक्टर चालकास व्यवस्थित वळण घेता न आल्याने दोन्ही ट्रॉल्या रस्त्याच्या कडेला कोसळल्या. या दरम्यान तुंगत येथून पंढरपूर कडे दुचाकीवरून (एम एच 13 सी.एन. 3763) निघालेले महेश बलभीम भोसले यांच्या अंगावर उसाने भरलेली ट्रॉली कोसळली.

महेश भोसले अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु यावेळी ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!