रविवारी पंढरीत 9 पॉझिटिव्ह अहवाल

पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण 359

पंढरपूर : ईगल आय मीडिया

रविवारी शहर व ग्रामीण 9 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यासह तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 359 एवढी झाली आहे.

शहरात नवीन 7 मेंढापुर, नारायण चिंचोली येथे 2 असे 9 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर या अहवालात एकूण 72 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी आलेल्या 81 रिपोर्ट्स मध्ये 9 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. तर 72 निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्हमध्ये शहरातील 7 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर ग्रामीण भागातील 2 अहवाल आहेत. शहरात नवीन रुग्ण महावीर नगर, गांधी रोड, घोंगडे गल्ली, अनिलनगर, पश्चिम द्वार, idbi बँकेजवळ अशा परिसरात रुग्ण सापडले आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 359 एवढी झाली आहे .

Leave a Reply

error: Content is protected !!