रविवार अखेर 1137 पॉझिटिव्ह ; एका पोलीस कर्मचाऱ्यासह 23 मृत्यू

लक्ष्मी टाकळी 28, मुंढेवाडी 10, ओझेवाडी 7 : भोसे पाठोपाठ इतरही गावात कोरोनाचे थैमान

पंढरपूर : ईगल आय मीडिया

रवीवारी आलेल्या अहवालात कोरोना 134 लोकांचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. त्यामध्ये लक्ष्मी टाकळी येथील सर्वाधिक 28 रुग्णांचा समावेश आहे. तर रविवारी झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट कॅम्पमध्ये 110 लोक पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या 1137 झाली आहे
दरम्यान शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अमीन मुलानी यांचा सोलापूर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ते 49 वर्षांचे होते.

रविवारी रॅपिड टेस्टिंग : 110 पॉझिटिव्ह

नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मोहिमेत रविवारी 513 लोकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 110 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय येथे 15 , निष्कर्ष लॅब येथे 1, लक्ष्मी टाकळी कॅम्प येथे 23, एन एम पी ओपीडी येथे 68, करकम्ब येथे 3 असे 110 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी 800 हुन अधिक लोकांची तपासणी केल्यानंतर 114 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
यासह पंढरपूर तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 1137 इतकी झाली आहे.


रविवारी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील कोरोना तपासणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये तालुक्यातील शहर व ग्रामीन भागातील 95 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह दर्शविण्यात आले आहेत. लक्ष्मी टाकळी येथील 11 पुरुष आणि 17 महिला असे 28 लोक पॉझिटिव्ह आले आहेत. तर ओझेवाडी या गावात 7 लोक पॉझिटिव्ह आले आहेत.मुंढेवाडी 5 पुरुष, 5 महिला असे 10 लोक पॉझिटिव्ह आले आहेत. त्याशिवाय भोसे, खेडभाळवणी, धोंडेवाडी, आढीव, वाखरी येथेही लोक पॉझिटिव्ह आले आहेत.

तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 1027 घरी सोडलेले 498
उपचार सुरू असलेले 506
आजवरचे एकूण मृत्यू 23 पंढरपूर शहर व तालुक्यातील मृत्यू दर 2.2 टक्के

पंढरपूर शहरातील भक्तिमार्ग, डाळे गल्ली, हरिदास वेस, गताडे प्लॉट, चंद्रभागा नगर, कर्मयोगी नगर, गोपाळपूर रोड, काशी कापडी गल्ली,जुनी पेठ, इसबावी, कोळी गल्ली, गजानन नगर,गोविंदपुरा, डोंबे गल्ली, चंद्रभागा घाट या भागात नवीन रुग्ण सापडले आहेत. रविवारी नगर पालिकेने चेस द व्हायरस हे अभियान सुरू केले असून शहरात नागरिकांनी रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यास मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!