विरोधक सरपंच होऊ नये म्हणून केला जादू टोणा !


पुणे जिल्ह्यातील विचित्र घटना

टीम : ईगल आय मीडिया

पुण्याच्या वडगाव मावळमध्ये टाकावे ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांची नावे असलेली लिंबे पिंपळाच्या झाडाला खिळ्याने ठोकून जादूटोणा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस अधिक तपास करत आहेत.


सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील टाकावे येथे इंद्रायणी नदीच्या कडेला ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, भूषण अस्वले आणि ऋषीनाथ शिंदे यांची नाव असलेली लिंबे पिंपळाच्या झाडाला खिळण्याने ठोकण्यात आली असून जादूटोणा करण्यात आला आहे.


याप्रकरणी, अविनाश अस्वले यांनी पोलिसात तक्रार दिली असून हा सर्व प्रकार सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर करण्यात आल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेचा गांभीर्याने तपास करावा अस त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!