भीमा नदीकाठचा वीजपुरवठा ८ तास करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिजित पाटील यांची मागणी

पंढरपूर : eagle eye news

पिण्याचे पाणी सोडून भीमा नदीकाठचा वीजपुरवठा किमान आठ तास करण्यात यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केली आहे. मुंबई येथे फडणवीस यांचे भेट घेऊन पाटील यांनी निवेदन दिले आहे. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत वीज पुरवठा ८ तास करण्यास सूचना दिल्या.

यावर्षी पाऊस चांगला आहे.नदीत आलेले पाणी किमान २ महिने पुरेल पण, लाईट नसेल तर पाणी असून काही फायदा शेतकर्‍याला होणार नाही. पाणी वाया जाईल व उभी पीके जळून जातील. त्यामुळे सध्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी आपण हि मागणी केली होती. याची दखल उपमुंख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी घेत पिण्याचे पाणी ठेऊन शेतीस लाईट सुरु करण्याच्या सूचना दिल्यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठा दिलासा मिळेल.

अभिजित पाटील
चेअरमन, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना

सध्या भीमा नदीकाठचा वीज पुरवठा २ तासच असल्यामुळे पिकांना पाणी देताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतातील उभी पिके करपु लागल्याचे दिसत आहे. यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. भिमा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांच्या पाईपलाईन ह्या नदीपासून १५ ते २० हजार फुट अंतरावर असल्यामुळे कमी वेळेत पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे जनावरांस पिण्यासाठी पाणी मिळत नाही. हा विद्युत पुरवठा ८ तास सुरू ठेवल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय होईल, असेही पाटील यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर संबंधिताना आदेश देऊन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे हा वीजपुरवठा लवकरच ८ तास सुरू होणार आहे. यामुळे शेतकऱ्याची अडचण दूर होणार आहे, असा विश्वास पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

error: Content is protected !!