पंढरपूर : eagle eye news
रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबई भेटीवर असलेल्या अभिजित पाटलांना सुखद धक्का बसला असून खा. सुप्रिया सुळे यांनी पाटील यांना राखी बांधली आणि मी ज्याला राखी बांधली आहे, तो भाऊ आमदार झाल्याचा इतिहास आहे, अशा शब्दात आशीर्वादही दिले. अभिजित पाटील याना खा. सुळे यांनी राखी बांधल्याचा व्हिडीओ आणि फोटो फोटो पंढरपूर तालुक्यात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे दोन दिवसांपासून मुंबईत आहे, मंगळवारी पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट पक्षाच्या बैठकीला हि हजेरी लावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाटील यांनी खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांना सुखद धक्का बसला. खा. सुळे यांनी आपल्या खुर्चीवरून उठत पाटील यांना राखी बांधली आहे.
सुप्रिया सुळे यांच्याकडून रक्षा बंधनाच्या दिवशी मिळालेल्या स्नेह पूर्वक भेटीमुळे अभिजित पाटील हि भारावून गेले. पाटील यांनी सुळे यांचे आशीर्वाद घेतले यावेळी सुळे यांनी मी ज्याना राखी बांधते तो भाऊ आमदार होतो, अशा शब्दात पाटील यांना आशीर्वाद दिले. पंढरपूर तालुक्यात याच रक्षा बंधनाची चर्चा रंगली आहे.
अभिजित पाटलांवर पक्ष देणार मोठी जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अभिजित पाटील यांनी सत्तेच्या मागे जाण्याऐवजी खा. शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. मंगळवेढा येथे त्यांचे जंगी स्वागत करून आपली निष्ठा दाखवून दिली. त्यामुळे मंगळवारी झालेल्या बैठकीत अभिजित पाटील यांच्यावर जिल्ह्यात मोठी जबाबदारी देण्याची चर्चा झाली आहे असे समजते