सुरेश आगवणे यांचे निधन

पांडुरंग परिवाराने खंदा शिलेदार गमावला

पंढरपूर : ईगल आय मीडिया

माजी आम. सुधाकरपंत परिचारक यांचे खंदे समर्थक,पांडुरंग परिवाराच्या विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या पांडुरंग चे संचालक सुरेश राजाराम आगवणे यांचे गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास उपचार सुरू असताना निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या पाठीमागे मोठा परिवार आहे, असून आज दुपारी खर्डी येथे अंत्यसंस्कार होत आहेत. त्यांच्या निधनाने पांडुरंग परिवाराने एक निष्ठावंत शिलेदार गमावला आहे.

सुरेश आगवणे हे मागील आठवड्यात शेतात काही कामानिमित्त गेले असता चक्कर येऊन पडले होते, तिथेच बेशुद्धावस्थेत असताना त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास यांचे निधन झाले.

ते कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक होते. जिल्हा परिषदेत समाजकल्याण समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले तसेच पंढरपूर तालुका पंचायत समितीमध्ये ही त्यांनी अनेक वर्षे सदस्य तसेच उपसभापती म्हणून काम केले.

परिचारक गटाचे ते खंदे समर्थक होते, तालुक्यातील राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली मात्र आगवणे कधीही परिचारक गटापासून बाजूला गेले नाहीत, अखेरपर्यंत निष्ठेने परिचारक गटासोबत राहिले होते. त्यांच्या निधनाने पांडुरंग परिवारातून शोक व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!