सुशांतसिंगचा अहवाल एम्सने सीबीआय कडे दिला

सीबीआय अहवालावरून करेल पुढील तपास

टीम : ईगल आय मीडिया

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी एम्सने सीबीआयकडे अहवाल सादर केला आहे. सीबीआयनेही एम्सच्या अहवालाचे विश्लेषण सुरू केलं आहे. सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? यावरून सीबीआय निष्कर्ष काढणार आहे.
एम्सच्या अहवालावर सीबीआय अंतिम निर्णय घेईल. सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? पुराव्यांच्या आधारावर सीबीआय निर्णयावर घेईल. ऑटोप्सी आणि व्हिसेराचा तपास अहवाल सीबीआयला सोपवण्यात आला आहे. सीबीआय या अहवालाची अन्य पुराव्यांशी तुलना करेल. अहवालाच्या आधारे सीबीआय आपला पुढील तपास करेल.

आता एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे. यानंतर सीबीआयकडून पुन्हा एकदा तपास सुरू होईल आणि अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये उघडकीस येतील.

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सर्व दृष्टीकोनातून करण्यात येत आहे आणि सुशांतच्या मृत्यूची व्यावसायिक पद्धतीने चौकशी केली जात आहे. सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. या प्रकरणात आता सुशांतचं कुटुंबीय आणि त्याच्या बहिणींची चौकशी सीबीआय करू शकते.

Leave a Reply

error: Content is protected !!