सुस्ते गाव आणि परिसर महापुराच्या विळख्यात

घरे, दुकाने, शेतीचे मोठे नुकसान : पंचनामे करून भरपाईची मागणी.

सुस्ते : नेताजी वाघमारे

भीमा नदीला आलेल्या महापुराने सुस्ते गाव आणि परिसराला विळखा घातला असून घरे, दुकाने, पिके यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

सुस्ते : शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात एवढे पाणी शिरले आहे

उजनी धरण पाणलोट क्षेत्र व पुणे सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या भीमा नदीच्या महापुराच्या पाण्याने संपूर्ण सुस्ते गाव व परिसर कवेत सामावून घेतल्याने भयभीत ग्रामसाथांना होड्यातून प्रवास करण्याची जेवघेणी पाळी आली आहे.

बुधवार पासून लाखो क्यूसेस प्रवाह व मुसळधार पावसाचे पाणी भीमा नदीत आल्याने हे पाणी नदी काठावरील सखल भागात गुरूवार – शुक्रवार या दोन दिवसात वेगाने पसल्याने जि.प.प्राथमिक शाळा, श्री दत्त विद्या मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, बचत भवन वर्क शेड इमारत, खंडोबा मंदिर परिसर व मैदान हनुमान मंदिराचे सभागृह व गावातील ब-याच घरांमध्ये हे पाणी शिरल्याने संपुर्ण गावाला या पाण्याचा विळखा पडला आहे. महापुराच्या संपुर्ण पाण्याने चोरमाळवस्ती, बोबडेवस्ती, अंबिकानगर, भीमनगर, इंदिरानगर (मातंगवस्ती) वेढली असल्याने गावठाण परिसरातील अनेक जुन्या घरांची पडझड होवून त्यांनी जलसमाधी घेतली आहे.

पुराच्या पाण्याने शेकडो हेक्टर ऊस शेतीचे नुकसान झाले असून कित्येकांची घरे पाण्यात कोसळल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. नुकसानग्रस्त परिसराचा व ऊस पिकाचा पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!