सुस्ते ग्रामपंचायत सरपंचपदी कांताबाई रणदिवे

उपसरपंचपदी तुषार चव्हाण : निवडणूक प्रक्रिया बिनविरोध.

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यातील पुर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणा-या सुस्ते ग्रामपंचायतीवर भीमा विठ्ठल परिवारांच्या कांतांबाई जीवन रणदिवे यांची संरपंच म्हणून तर भीमाचे विद्यमान संचालक तुषार चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

एकुण 13 सदस्य संख्या असलेल्या या या ग्रामपंचायतीवर गेल्या चाळीस वर्षापासून परिचारक गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांचे वर्चस्व होते.यंदाच्या पंचवार्षिक निवडणूकीत घाडगे अवघे पाच सदस्य निवडून आले आहेत तर आठ जागा जिंकत भीमा विठ्ठल परिवार सत्तेचा हक्कदार ठरला.

सरपंच निवडीप्रसंगी 13पैकी 10सदस्य हजर होते. या घाडगे गटाच्या तीन सदस्यासानी गैरहजर राहात या प्रक्रियेत भाग घेतला नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सरपंच पदासाठी भीमा विठ्ठल परिवाराच्या कांतांबाई रणदिवे व तुषार चव्हाण यांनी अनुक्रमे सरपंच उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर घाडगे गटाच्या विशाल कसबे यांनी सरपंच व उपसरपंच पदासाठी दत्ता बोबडे यांनी अर्ज दाखल केले.

मुदती अंती विशाल कसबे दत्ता बोबडे यांनी अर्ज काढून घेतल्यानंतर कांतांबाई रणदिवे यांची संरपंच म्हणून तर तुषार चव्हाण यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध झाल्याचे अध्यासी निवडणूक निर्णय अधिकारी एम् एन् देककते यांनी जाहीर केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी व्ही.के.गवळी, तलाठी डोरले यांनी काम पाहीले.

याप्रसंगी माधव चव्हाण, अतुल चव्हाण, तात्या नागटिळक, अंनता चव्हाण, गणेश बोबडे ,संतोष सुळे, विठ्ठलचे माजी संचालक रामदास चव्हाण, तानाजी चव्हाण, धनाजी सालविठ्ठल, वसंत घाडगे, पांडुरंग कदम, धनाजी घाडगे, पापा चव्हाण, सतिश चव्हाण,रमेश रोकडे, संभाजी चव्हाण, बाजीराव वाघमारे, सुभाष रणदिवे, यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

सरपंच- उपसरपंच पदाच्या निवडीनंतर भीमा – विठ्ठल परिवाराच्या पदाधिका-यांनी फटाक्यांची आतिशबाजी, गुलालाची मुक्त उधळण करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

Leave a Reply

error: Content is protected !!