सुस्ते ग्रामपंचायत : दिलीप अप्पा समोर विठ्ठल परिवाराचे आव्हान

घाडगे यांच्या प्रतिष्ठेची तर विठ्ठल-भीमा परिवारासाठी अस्तित्वाची लढाई

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील पूर्वभागातील ग्रामपंचायत सुस्ते राजकीय दृष्ट्या ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष दिले जाते,गेल्या ४० वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीप घाडगे यांची सत्ता आहे. ही पंचवार्षिक निवडणूक ही दुरंगी होत आहे. विठ्ठल-भीमा परिवार व घाडगे गटात लढत होत आहे, पारंपरिक लढत असली तरी नव्या चेहऱ्यानी दोन्ही गटात प्रवेश केला आहे,त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे.

सुस्ते ग्रामपंचायतीसाठी १३ जागेसाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही गटांनी प्रचारात आघाडी घेतली असून भेटीगाठी वर दोन्ही गटाने लक्ष केंद्रित केले आहे. मागील वेळेस दिलीप घाडगे यांच्या सोबत असणारे सप्तशृंगी परिवाराचे प्रमुख अतुल चव्हाण व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अनंता चव्हाण यांनी विठ्ठल भीमा परिवाराला पाठिंबा दिल्यामुळे मध्ये परिवारामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. शिवाय दिलीप आप्पा घाडगे यांच्या गटालाही युवा सेनेचे योगेश भैय्या चव्हाण,युवा नेते हणमंत तात्या चव्हाण यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे ही बळ वाढले आहे त्यामुळे निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण होत आहे.

प्रभाग ४ लक्षवेधी ! प्रभाग चारमध्ये विठ्ठल-भीमा परिवाराकडून भीमा कारखान्याचे विद्यमान संचालक तुषार चव्हाण व घाडगे गटाकडून विद्यमान सरपंच बाळासाहेब लोकरे हे निवडणूक लढवीत आहेत.अतिशय चुरशीची ही लढत होत आहे,त्यामुळे या लढतीकडे भागातील सर्व राजकीय नेतेमंडळींचे लक्ष लागले आहे.

मागील पंचवार्षिक निवडणूक ही विठ्ठल भीमा परिवार, दिलीप आप्पा घाडगे गट व युवा सेना अशी तिरंगी झाली होत. युवासेना व विठ्ठल परिवार यांच्यात जागावाटप ताळमेळ न झाल्यामुळे ही त्यांची युती तुटली होती. युवासेनेची असणारी मते ही विठ्ठल – भीमा परिवारातील आहेत, त्यामुळे याचा फायदा या पंचवार्षिक निवडणुकीत घाडगे गटाला होण्याची शक्यता आहे. परंतु विठ्ठल भीमा परिवाराने अतुल चव्हाण व आनंता चव्हाण यांना सोबत घेतल्यामुळे त्यांच्याही मोठी मतांची संख्या आहे,याचा फायदा विठ्ठल भीमा परिवाराला होणार का हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!