भोसेत विरोधकांचे डिपॉझिट जप्त : उपरी, सोनके, खरसोळीत परिवर्तन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप अप्पा घाडगे यांना धक्का बसला आहे. 40 वर्षांची सत्ता उलथवून टाकत सर्वपक्षीय आघाडीने 13 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. संपूर्ण तालुक्यात या निकालाने खळबळ उडाली आहे. दरम्यान, भोसे ग्रामपंचायत च्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विरोधी 5 ही उमेदवार पराभूत झाले आहेत. 4 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
परिवर्तनाचा धडाका कायम असून सोनके, खरसोळी, पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांचे सुस्ते ग्रामपंचायत वर गेल्या 40 वर्षांपासून वर्चस्व आहे. अनेकवेळा विरोधकांनी प्रयत्न करूनही दिलीप अप्पांचा गड अभेद्य होता. मात्र यावेळी सर्व पक्षीय युवक आघडीने सत्ता परिवर्तन करीत 13 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. घाडगे गटाला 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 7 व्या फेरीतील सोनके ग्रामपंचायती मध्ये भालके – काळे 6 तर परिचारक गटाने 5 जागा जिंकल्या आहेत.
तर उपरी मध्ये परिवर्तन झाले असून काळे – भालके गटाने सत्ता खेचून घेताना 11 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत तर परिचारक – भालके गटाने 5 जागा जिंकल्या आहेत. तावशी मध्ये भालके -परिचारक गटाने 11 जागा जिंकल्या आहेत तर अवताडे गटाने 2 जागा जिंकल्या आहेत. रांजनी मध्ये 6 जागा परिचारक गट तर 5 जागी आ.भालके गट विजयी झाला आहे.
सरकोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 7 जागा बिनविरोध झाल्या आहेत तर उर्वरित 6 जागा सर्वपक्षीय आघाडीने जिंकल्या आहेत. देगाव ग्रामपंचायत मध्ये 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या तर 5 जागा सर्व पक्षीय आघाडीने जिंकल्या आहेत.
चळे ग्रामपंचायत निवडणूक लक्षवेधी ठरली असून येथे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे, भालके गटाचे ज्ञानेश्वर मोरे यांच्या आघाडीने 8 जागा सत्ता मिळवताना पांडुरंग सहकारी चे संचालक हरीश गायकवाड (5 जागा ) यांच्या गटाचा पराभव केला आहे. तिसंगी ग्रामपंचायतीच्या निवणुकीमध्ये काळे -भालके आघाडी 8 तर परिचारक गटाला 3 जागा मिळाल्या आहेत.
भांडीशेगाव येथे भालके -परिचारक -काळे गटाने 11 जागा मिळाल्या तर काळे आणि स्वाभिमानी शेतकरी संगटना आघडीने 2 जागा मिळवल्या आहेत. धोंडेवाडी त सर्व पक्षीय आघडीने 10 जागा जिंकल्या तर 1 जागी अपक्ष विजयी झाला आहे. रांजनीमध्ये परिचारक भालके आघाडीने 6 तर परिचारक भालके आघाडीने 5 जागा जिंकल्या. इथं परिचारक आणि भालके गटाने परस्पर विरोधी आघाडी केली होती. तर गोपाळपूर येथे परिचारक -भालके गटाने 12 तर विरोधी परिचारक, अवताडे, काळे गटाने 3 जागा जिंकल्या आहेत.
कौठाळी ग्रामपंचायत मध्ये परिचारक – काळे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी चे संचालक मोहन नागटिळक यांच्या सौभाग्यवती पराभूत झाल्या आहेत. खरसोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिचारक – काळे गटाने 6 जागा जिंकल्या आहेत. तर विरोधी आघाडीने 3 जागा जिंकल्या आहेत.
कान्हापुरी ग्रामपंचायतमध्ये परिचारक – आ.शिंदे गटाने 6 तर परिवर्तन पॅनल ने 3 जागावर यश मिळवले आहे. तारापूर ग्रामपंचायत निवडणुकीत परिचारक गटाने 10 जागा जिंकल्या आहेत. तर काळे गटाने 1 जागा जिंकली आहे. करोळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या तर सर्व पक्षीय आघाडीने 7 जागा जिंकल्या आहेत.