स्वेरीत डॉ. स्नेहा रोंगे यांचे विशेष मार्गदर्शन सत्र संपन्न

गर्भाशय कॅन्सर आणि ‘सर्वावॉक’ वैक्सीनवर दिली महत्वपूर्ण माहिती

पंढरपूर : ईगल आय न्यूज

डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटल, पंढरपूर व स्वेरीज् अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरी अंतर्गत सर्व महाविद्यालयांतील शिक्षिका, महिला शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींसाठी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा सुरज रोंगे यांच्या ‘सर्वावॉक (cervavac) कॅन्सर वैक्सीन’ या विषयावरील मार्गदर्शन सत्र संपन्न झाले.


स्वेरीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये महिलांच्या गर्भाशयाच्या आजारासंदर्भात या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. या सत्रात त्यांनी ‘सर्वावॉक’ लसीवर माहिती दिली. ‘सर्वावॉक (cervavac) ही एक लस आहे जी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) मुळे होणा-या रोगांपासून संरक्षण करू शकते. स्त्रियांच्या अशा आणि इतर अनेक आजारावर डॉ. स्नेहा रोंगे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना त्यांनी ‘गर्भाशयाचा कॅन्सर’ म्हणजे काय? तो कधी होतो, हे सांगून यासाठी वयाच्या १५ ते २६ वर्षात मुली अथवा महिला ही लस घेऊ शकतात असे सांगितले. पुढे त्यांनी गर्भपिशवीचा कॅन्सर कशामुळे होतो याबाबत माहिती दिली. या कॅन्सरमु‌ळे जवळपास ७७ हजार रुग्ण दरवर्षी मृत्यू पावतात असे सांगून ही लस कोणी घ्यायची याविषयी माहिती देवून लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले.

तसेच या वैक्सीनच्या विविध प्रकारांबाबत माहिती सांगितली. ‘सर्वावॉक (cervavac) वैक्सीन हे मार्केटमध्ये सहजरीत्या उपलब्ध होत आहे असे सांगून सर्व मुली/महिलांनी त्यांच्या आजूबाजूला या लसीबद्दल जनजागृती करावी असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी अभियांत्रिकीच्या उपप्राचार्य व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. स्वाती पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दिप्ती तंबोळी आदी उपस्थित होते. डॉ. नीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) च्या समन्वयिका प्रा.मिनल भोरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!