स्वेरीत ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ विभागाचा पालक मेळावा संपन्न
पंढरपूर : eagle eye news
स्वेरीनेपालकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. आमच्या पाल्यांमध्ये शिक्षण, शिस्त, आत्मविश्वास आणि संस्कार यामध्ये कमालीची प्रगती दिसून येत आहे. एकूणच पाल्यांच्या प्रगतीमध्ये स्वेरीचा सिंहाचा वाटा आहे. स्वेरीतील शिस्त व संस्कार या गुणामुळे आमचा पाल्य अभियंता घडण्याबरोबरच एक चांगला माणूस म्हणून समाजात नावारूपास येत आहे.’ असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी दिलीप ढाकणे-पाटील यांनी केले.
विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार या पालकांशी संवाद साधताना, विविध शैक्षणिक उपक्रम, ट्रिपल पीई, इफेक्टिव्ह टीचिंग-लर्निंग स्कीम, नाईट स्टडी, महाविद्यालयाला मिळालेली विविध मानांकने, स्पर्धा परीक्षेची तयारी, प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घेतलेली गरुड झेप, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्राणायम, आर्ट ऑफ लिव्हिंग सारखे प्रशिक्षण आदी बाबत सविस्तर माहिती दिली.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ या विभागातर्फे ‘पालक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पालक प्रतिनिधी दिलीप ढाकणे-पाटील, सचिन बारटक्के व महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. योगेश्वरी जोशी ह्या उपस्थित होत्या.
प्लेसमेंट विभागाचे प्रा.अविनाश मोटे, नवनाथ फुगारे, सौ. जामदार, सौ.अनुराधा आहिरे, संजय शिंदे, सौ.स्वाती लोटके, सुनील घाडगे, सौ.योगेश्वरी जोशी, सचिन बारटक्के यांच्यासह काही पालकांनी आपले विचार मांडले. या पालक मेळाव्यात जवळपास १०० पालक, तसेच विभागातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा.जे.एस.शिंदे यांनी केले तर डॉ. एन.पी. कुलकर्णी यांनी आभार मानले.