पंढरपूर : eagle eye news
इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (आयईआय) यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरमध्ये संपन्न झालेल्या ‘इंजिनिअरिंग युथ फेस्टिवल’ मध्ये श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाने विविध क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘इंजिनिअरिंग युथ फेस्टिवल’ अंतर्गत विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुले खो-खो, कब्बडी या क्रीडा प्रकारात विजेते तर हॉलीबॉल मध्ये उपविजेते ठरले, तसेच धावणे या क्रीडा प्रकारात त्यांनी विजेतेपद व उपविजेतेपदही पटकावले. खो-खो स्पर्धेत बालाजी दामाजी शेंबडे याच्या नेतृत्वाखाली मुलांनी विजेतेपद पटकावले. मुलींच्या खो-खो स्पर्धेत देखील कु.सोनाली रमेश मिसाळ हिच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले. कबड्डी मध्ये कु.धनश्री राजकुमार व्यवहारे हिच्या संघाने तर हॉलीबॉल मध्ये दीपक संभाजी शिंदे यांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
वैयक्तिक खेळामध्ये धावण्याच्या १०० मीटर प्रकारात दीपक शिंदे, २०० मीटर धावण्यात अविराज विजय नागटिळक यांनी विजेतेपद तर विराट शेटे यांनी उपविजेते पद पटकावले. ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत धनश्री व्यवहारे ही विजेता ठरली. ४ बाय १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुलींनी बाजी मारली. तर ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत निशा शिंदे ही विद्यार्थिनी विजेती ठरली. मराठी वकृत्व स्पर्धेमध्ये शिवभक्ती देशमुख, रांगोळी मध्ये स्नेहल अंबुरे व शिवभक्ती देशमुख, पुस्तक परीक्षण मध्ये गणेश जगदाळे व सुरज करंडे, मेहंदी स्पर्धेत मयुरी जगदाळे व शिवभक्ती देशमुख, मराठी निबंध स्पर्धेमध्ये रुही गणेश तेंडुलकर, हिंदी वादविवादमध्ये अमोल बेद्रेकर व ज्ञानेश्वरी गोफणे आदी विद्यार्थी विजेते ठरले.
यशस्वी विद्यार्थ्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. संजय मोरे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ.यशपाल खेडकर व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, डॉ.संतोष राजगुरू, नामदेव कागदे, विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, एच.एम.बागल, बी.डी. रोंगे, प्रा. सुरज रोंगे, विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे यांच्यासह, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी खेळाडूंचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.