स्वेरीच्या ४९ विद्यार्थ्यांची ‘कॅपजेमिनी’ या कंपनीत निवड


स्वेरीकडून विद्यार्थ्यांना यावर्षी ६०० हून अधिक नोकरीच्या संधी



पंढरपूर : ईगल आय न्यूज

‘कॅपजेमिनी’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल ४९ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून स्वेरीकडून विद्यार्थ्यांना यावर्षी ६०० हून अधिक नोकरीच्या संधी देण्यात आलेल्या आहेत.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘कॅपजेमिनी’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी वार्षिक रु.४ ते ७.५ लाखांचे पॅकेज मिळाले आहे.

या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून शिवानी राजकुमार घायतिडक, हनुमान मनोहर जाधव, महेश अनिल थोरबोले, श्रद्धा अण्णाराव सुरवसे, संस्कृती राजकुमार पैतवार, प्रतिक सुभाष देशपांडे, रोहन उदय शिंदे, श्रुती बापूसाहेब बिले, नवीन अमोल मदुर, प्रियांका मारुती माने, अभिजीत अजय कारंडे, प्रतीक राजेंद्र यादव, सानिका रमेश व्यवहारे, गौरव राजेंद्र वाघमारे, चेतन रमेश क्षीरसागर, विवेक महेश निकते, फिझा सैफन शेख, स्नेहा चिंतामणी लोहोकरे, मधुरा मिलिंद बडवे, सोहम नागेश नलवडे, दिक्षा दिगंबर लाळे, क्षिप्रा विद्याधर कुरणावळ, प्रतीक्षा संजय खोबरे, मंगेश धनंजय वेदपाठक, सुयश शंकर आवताडे, ओंकार महादेव येळसंगे, आदित्य दत्तात्रय पवार, ऋषिकेश पितांबर देशमुख, विजय रंगनाथ साळुंखे, वैष्णवी झुंबर सुरवसे, कैवल्य काकासाहेब माने, श्रद्धा दत्तात्रय गजाकोश, अथर्व मकरंद कुलकर्णी, सचिन अशोक क्षीरसागर, निखील दिलीप मुंढे, युवराज विनोद शेलार, धनंजय राजेंद्र आदमाने, काशिलिंग कालिदास सरक, विवेक दशरथ रोंगे, अनिकेत अण्णासाहेब बनसोडे, रिधम गिरीश परमार, रोहित दत्तात्रय विधाते, ओंकार संतोष पवार, मदन कल्याण पाटील, जयदेव दिपक ननवरे, गणेश शंकर तोडकर, निलेश संजय कदम, सौरभ बंडू कडसरे व ऋतिक रमेश घोडके या ४९ विद्यार्थ्यांची निवड केली.

स्वेरी अभियांत्रिकीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’चे ४ पैकी३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ हे मानांकन मिळाले आहे. ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी.(युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन मिळविणारे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सोलापूर विद्यापीठातील पहिले व एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.

सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य,अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी ‘कॅपजेमिनी’ या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!