स्वेरीच्या प्रगती साळुंखे व विजय भड यांची कंपनीत निवड

सुरुवातीलाच वार्षिक रु. साडेपाच लाखांचे पॅकेज मिळाले



पंढरपूर : ईगल आय न्यूज

‘त्रिवेणी टर्बाईन’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रगती साळुंखे व विजय भड या विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे आणि सुरुवातीलाच वार्षिक साडे पाच लाख रुपयांचे पॅकेज या विद्यार्थ्यांना मिळाले आहे ’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंटसाठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील तज्ञ प्राध्यापकांचे व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


बेंगलोर येथील ‘त्रिवेणी टर्बाईन’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रगती सुरेश साळुंखे व विजय दत्तात्रय भड या दोन विद्यार्थ्याची निवड केली असून त्यांना प्रत्येकी वार्षिक रु. साडेपाच लाख इतके पॅकेज मिळाले आहे. त्रिवेणी टर्बाईन ही स्टीम टर्बाईन क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. प्रगती साळुंखे व विजय भड या दोघांनी पदवीच्या शिक्षणासाठी स्वेरीचे इंजिनिअरिंग कॉलेज निवडले आणि अत्यंत कष्टाने शिक्षण घेऊन हे यश मिळविले आहे.

संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विभागातील प्रगती साळुंखे व विजय भड यांचे अभिनंदन केले.

One thought on “स्वेरीच्या प्रगती साळुंखे व विजय भड यांची कंपनीत निवड

Leave a Reply

error: Content is protected !!