पंढरपूर : ईगल आय मिडीया
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी ठिकठिकाणी दूध बंद आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पंढरपूर तहसील वसमोर पैलवानांना दूध पाजून व जोर बैठका व्यायाम करुन तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना दुधाचे वाटप करून दूध आंदोलन करण्यात आले.
यावेळी दूध संचालक यांना शेतकऱ्यांचे मागण्याचे निवेदन देण्यात आले.
त्यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, संपर्क प्रमुख रायाप्पा हळणवर, तालीम संघाचे अध्यक्ष सोमनाथ सुर्वे नानासाहेब चव्हाण, अतुल करंडे, पप्पू पाटील, रणजित बागल, विश्रांती भुसनर, चंद्रकांत म्हस्के,सावता राक्षे, अतुल गायकवाड, अण्णा मोलणे, नितीन पाटील आदीसह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.