पंढरपूर : ईगल आय मीडिया
राज्यात एकीकडे बि-बियाण्याचा तुटवडा जाणवत असताना स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सोनलकरवाडी (ता.माढा) , ऊळे (ता.द.सोलापूर), डोणज (ता. मंगळवेढा) येथील साठ शेतकऱ्यांना तुर , मुग , उडीद, सोयाबीन, बाजरी , चवळीच्या बियाणांचे वाटप स्वाभीमानी पक्ष प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर , युवा प्रदेश अध्यक्ष अमरसिंह कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पक्ष जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, केदार कदम, श्रीमंत केदार, दिनेश शिंदे , संभाजी पाटील, राहुल बिडवे ,पप्पु पाटील,महादेव शिंदे, दिलीप बालवडकर यांच्यासह स्वाभीमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्यभाव व विविध प्रश्नावर लढणाऱ्या स्वाभीमानी संघटनेने शेतकऱ्यांना बियाण वाटप केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.