महाविकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर ?

सचिन पाटलांच्या उमेदवारी अर्जाला स्वाभिमानीच्या A – B फॉर्मची जोड

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला अधिकृत उमेदवार उतरवला असून आज सचिन पाटील यांच्या अर्जाला स्वाभिमानी पक्षाचा A B फॉर्म जोडला आहे. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिकृतपणे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचे मानले जात आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने राष्ट्रवादी चे भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपकडून उद्योजक समाधान अवताडे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीची घटक पक्ष असल्याने सचिन पाटील यांच्या उमेदवारीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

4 एप्रिल पासून माजी खासदार राजू शेट्टी स्वतः मतदारसंघात गावोगावी प्रचारसभा घेणार आहेत असे स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी सांगितले आहे. स्वाभीमानी चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह राज्यभरातून स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी येणार असल्याचेही तानाजी बागल यांनी सांगितले.

आज महाविकास आघाडीच्या मंचावर जे स्वाभिमानीचे कार्यकर्ते म्हणून उपस्थित होते त्यांच्याबाबत राजू शेट्टी हेच योग्य तो निर्णय घेतील असेही बागल म्हणाले.

दरम्यान, आज पंढरपूर येथे महाविकास आघाडीच्या पहिल्याच प्रचार सभेला स्वाभिमानीचे माजी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे मंचावर उपस्थित होते आणि त्यांनी भाषण ही केले. त्याचवेळी बोलताना राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपले आज सकाळी राजू शेट्टी यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगितले होते. मात्र स्वाभिमानी ने आपला A B फॉर्म सचिन पाटील यांना दिला असून आज पाटील यांनी तो फॉर्म आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडला आहे.

आज महाविकास आघाडीच्या मंचावर जे स्वाभिमानीचे कार्यकर्ते म्हणून उपस्थित होते त्यांच्याबाबत राजू शेट्टी हेच योग्य तो निर्णय घेतील असेही बागल म्हणाले. यावरून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!