वीज बिल तोडणी थांबवा : थकीत बिले देण्याची व्यवस्था करा !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवारांना साकडे

टीम : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्ह्यातील शेती पंपाच्या वीज कनेक्शन कट करण्यास मनाई करावी आणि व थकीत ऊस बिले लवकरात लवकर दिली जावी या मागणीसंदर्भात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा.शरद पवार यांची भेट घेतली. आज सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने खा.पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या संदर्भात मागणी केली.


यावर्षी वीज वितरण कंपनीने, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी महावितरणचे खाजगीकरण होईल, ते टाळण्यासाठी वीज बिल भरावे असे आवाहन केले होते. त्यास शेतकरी संघटना व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि सर्व शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीच्या अवाहनानुसार वीज बिले भरली.


यावेळी पंढरपुर परिसरातील ऊस बिल, कामगारांचे पगार, तोडणी वाहतूक बिलं, थकविणाऱ्या विठ्ठल , भीमा , दामाजी, चंद्रभागा कारखान्यासंदर्भात ही चर्चा केली. यावर खा. पवारानी चिंता व्यक्त केली. कारखान्याची परिस्थिती गंभीर आहे, आता सभासदांनी जागृत झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.


मात्र आता परत एकदा महावितरण ने वीज बिलासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. कोरोना महामारी आणि लाॅकडाऊन मुळे अर्थकारण ठप्प, शेतीमालाचे पडलेले दर, मागिल वर्षी गेलेल्या ऊसाचे अजुन ही बिल मिळाले नाही, अशा सर्व परिस्थितीत वीज बिल भरणे शेतकऱ्यांना सध्या तरी शक्य नाही. कृषी पंपाचे कनेक्शन कट केले तर शेतकऱ्यांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे लक्षात घेऊन खा. पवार यांना लक्ष घालून सक्तीची वीज बिल वसुली बंद करुन, वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचे आदेश महावितरण ला देण्यात यावेत अशी विनंती केली.

यावेळी युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपुर तालुका अध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा संघटक शहाजहान शेख, कार्याअध्यक्ष सचिन आटकळे, युवा तालुका अध्यक्ष अमर इंगळे उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!