तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा विकास शक्य’ : सुरेश शेणॉय


स्वेरीत जागतिक पातळीवरील तज्ञांचे करियर मार्गदर्शनपर संमेलन संपन्न 


पंढरपूर : ईगल आय न्यूज

‘आजचा भारत देश हा जगातील प्रगत देशांच्या तुलनेत खूप तरुण आहे. भारतीय तरुण हे उद्याच्या विकसित देशाचे आधार आहेत. त्यांनी जर नवीन कौशल्ये, नवीन करिअरच्या संधी शोधल्या तर भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे. केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा विकास शक्य आहे.’ असे प्रतिपादन व्हील्स ग्लोबल फाउंडेशन (युएसए)चे अध्यक्ष सुरेश शेणॉय यांनी केले.


         स्वेरीच्या श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलंस, सोबस बेंगलोर आणि व्हील्स ग्लोबल फौंडेशन, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक्ससलरेटींग रुरल इनोव्हेशन अँड सोशल एन्टरप्रेनरशिप या विषयावर आयोजित संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून  सुरेश शेणॉय बोलत होते. 


यावेळी सोबस इनसाइट फोरमचे व्यवस्थापकीय संचालक दिग्विजय चौधरी यांनी प्रास्ताविक केले. तर स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून व्हील्स ग्लोबल फाउंडेशन च्या कार्यावर प्रकाश टाकला व  उद्योजकता विकासाचे महत्व  सांगितले.  


मास्टेक चे संस्थापक चेअरमन अशांक देसाई म्हणाले कि, ‘भारताचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. तर रतन अग्रवाल म्हणाले की, ‘उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य प्रश्न विचारण्याची सवय लावणे आवश्यक आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी नवीन आव्हाने स्वीकारली पाहिजेत.


 श्री विठ्ठल कारखान्याचे  चेअरमन अभिजित पाटील  म्हणाले की, ‘जीवनात अगोदर आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. आपण भविष्यात काय करणार आहोत हे जर ठरविले तर त्यातून नक्कीच यश मिळते.  उत्पादन, ट्रेडींग आणि सेवा या तीन क्षेत्रांमुळे यशस्वी उद्योजक होता येते. जे काम आवडते त्यात करिअर करा, असे आवाहन पाटील यांनी केले.


 डब्ल्यूजीएफ, यूएसए मधील माजी राजदूत आणि सचिव प्रदीप कपूर, उद्योजक राज डुबल, धनश्री परिवारचे प्रा. शिवाजीराव काळुंगे, जकराया साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सचिन जाधव, संजय घोटाळकर हे देखील उपस्थित होते. 


 यावेळी डब्ल्यूजीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेव्हीजी कृष्णमूर्ती,  सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुशील भाटिया, सुरेश अडवाणी, डॉ.विभा गुप्ता,  सुंदर कामथ,सौ. कामथ, सौ.देसाई, डॉ.वर्षा वैद्य, नितिन कुलकर्णी,  रेषा पटेल, गिरीष संपत,  आकांक्षा सिन्हा, स्वेरीचे विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, एच.एम.बागल,  दादासाहेब रोंगे, बी.डी.रोंगे, प्रा. सुरज रोंगे, डॉ. प्रदीप जाधव, प्रा. एम.एम. पवार, प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे, डॉ. प्रवीण ढवळे यांच्यासह इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार  डॉ. प्रशांत पवार यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!