स्वेरीमुळे ग्रामीण महाराष्ट्रात तंत्र शिक्षणाचा प्रसार : पद्मश्री पोपट पवार


स्वेरीचा रौप्य वर्षारंभीचा विशेष कार्यक्रम थाटात संपन्न !


पंढरपूर : ईगल आय न्यूज

 एखाद्या संस्थेच्या उभारणी मागचा हेतू फार महत्वाचा असतो. शिक्षणाला संस्कारांची जोड देणे आवश्यक आहे. स्वेरीची शैक्षणिक वाटचाल पाहिली तर असे लक्षात येते कि या संस्थेची स्थापना ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचा प्रसार करण्यासाठी झाली आहे, आणि एकूणच स्वेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होत आहे, असे प्रतिपादन  हिवरे बाजार (जि. अहमदनगर) चे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.      

    गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील पदार्पणा निमित्ताने आयोजिलेल्या विशेष कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त ब्रिगेडीयर डॉ. सुनील बोधे हे होते. 

स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी प्रास्ताविक करताना,  स्वेरीच्या  सुरुवाती पासूनच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे, स्वेरीस मिळालेली मानांकने, संशोधन निधी, विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या सोईसुविधा, कमवा आणि शिका योजना, प्लेसमेंट मधील गरुडझेप आदी महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या.

  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील म्हणाले की, ‘रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे स्वेरीने आता तारुण्यात पदार्पण केले आहे. स्वेरीचा प्रवास पाहिला असता भविष्यात स्वेरीची व विद्यार्थ्यांची नक्कीच दुपटीने प्रगती होईल. 


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना  ब्रिगेडीयर डॉ. सुनील बोधे म्हणाले की, ‘स्वेरीच्या व्यवस्थापनाचे नेतृत्व, प्राध्यापकांचे परिश्रम यामुळे विद्यार्थ्यांच्या कष्टाला मधुर फळे लागत आहेत. ज्यांचा इतिहास अत्यंत संघर्षपूर्ण असतो त्यांचा भविष्यात उज्वल असतो. संपूर्ण राज्यातून विद्यार्थी स्वेरीत येतात आणि परिश्रमाने गुणवत्ता मिळवतात. त्यामुळे देशाच्या जडणघडणीत स्वेरीचे कार्य अतिशय उत्तमपणे सुरु आहे. 


यावेळी  विठ्ठल कारखान्याच्या  व्हाईस चेअरमन  सौ.प्रेमलता रोंगे, गोपाळपूरचे सरपंच विलास मस्के, ग्रामसेवक दानोळे, सौ. चंदाताई तिवाडी, आर्कीटेक्ट कोंडा, आदिनाथ देशमुख, तांबे, सौ. सुनिता बोधे, मोहन अनपट, शिवाजी आसबे, के.बी.पी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, डॉ. दादासाहेब साळुंखे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त विजय शेलार,  आर.बी.रिसवडकर, एन.एम.पाटील, एस.टी.राऊत, एच.एम.बागल, बी.डी. रोंगे, प्रा. सुरज रोंगे, इतर पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर स्वेरीचे जेष्ठ संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!