पंढरपूर : ईगल आय मीडिया
श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील एकूण ४० विद्यार्थ्यांनी बांधकाम क्षेत्रातील सुधारित कायदा (कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिल) या सिव्हिल इंजिनिअरिंग संदर्भातील अतिशय महत्वाच्या एक महिन्याच्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला.
‘कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिल’ ही भारत सरकारच्या नियोजन आयोगाने स्थापन केलेली व बांधकाम उद्योगातील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असलेली संस्था आहे. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील अंतर कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील इंटर्नशिप प्रोग्राम (एनएलआयपी) अंतर्गत हे प्रशिक्षण संपन्न झाले.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्लीने सर्व एआयसीटीई मान्यताप्राप्त विद्यापीठे, महाविद्यालये व संस्थांना एक निर्देश जारी केला होता त्यानुसार या प्रशिक्षणात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान देऊन त्यांची रोजगारक्षमता वाढवणे आवश्यक आहे. नवीन शिक्षण प्रणाली मध्ये प्रत्येक महिन्याच्या सातव्या दिवसापासून नवीन बॅचेस सुरू होतात. यामध्ये स्वेरीच्या ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंटर्नशिपद्वारे उद्योग-धंद्यातील जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. रोजगारक्षमता वाढीसाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य प्राप्त होण्यासाठीही या उपक्रमाची मदत झाली. सीआयडीसीने काही विशिष्ट क्षेत्रे ओळखली आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान मिळवणे आणि प्रभावीपणे काम करण्यासाठी त्यांची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे.
या कोर्स दरम्यान गुणवत्ता आश्वासन, कौशल्य मूल्यांकन, बिलिंग, साइट अकाउंटन्सी इत्यादी आवश्यक विषय देखील शिकवण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विद्याराणी क्षीरसागर, प्रा. सोनाली पाटील यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. सहभागी विद्यार्थ्याना डीजीसीआयडीसीचे प्रमुख डॉ. पी. आर स्वरूप यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्रे देण्यात आली.