स्वेरीच्या आणखी दहा विद्यार्थ्यांना जॉब

प्रत्येकास मिळाले वार्षिक रु ४.७१ लाखांचे पॅकेज


पंढरपूर : ईगल आय न्यूज

‘पर्सीस्टंट सिस्टिम्स’ या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे, या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4.71 लाख रुपयाचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे,  अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.     

     ‘पर्सीस्टंट सिस्टिम्स’ या नामांकित व बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.

या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून अभिषेक श्रीमंत बनगर, स्नेहा चिंतामणी लोहोकरे, वैष्णवी ज्ञानेश्वर जगनाडे, भास्कर अनिल इताप, विश्वजित उदय राजोपाध्ये, सुरज बाळकृष्ण गुंड, प्रशांत जगन्नाथ जलगिरे, स्नेहल विद्यासागर देशमाने, अजय वैजिनाथ धबडे व जयेश सतिश इंगळे या १० विद्यार्थ्यांची निवड केली.

या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु ४.७१ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.  या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या  विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. 

या दोघींना ही मिळाले वार्षिक 9 लाख रुपयांचे पॅकेज

 ‘इंटेलिपॅट सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या  कंपनीच्या निवड समितीने कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कोमल रेवणसिद्धेश्वर अच्चुगटला व समृद्धी राजेंद्र देशपांडे या दोन विद्यार्थीनींची निवड केली. दोघींनाही प्रत्येकी वार्षिक रु. ९ लाखांचे पॅकेज मिळाले आहे.


संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी  ‘पर्सीस्टंट सिस्टिम्स’ कंपनीममध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!